भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशला सहा विकेट्सने हरवून आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली होती, तर पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध 60 धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. कराचीमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवानंतर पाकिस्तान संघ दुबईला पोहोचला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा सामना रविवार, 23 फेब्रुवारी रोजी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. टॉस त्याच्या अर्धा तास आधी, म्हणजे दुपारी 2:00 वाजता होईल.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी.
पाकिस्तान: बाबर आझम, इमाम उल-हक, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान अली आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.