भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान, जेव्हा हार्दिक पांड्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची विकेट घेतली, तेव्हा कॅमेरा प्रेक्षकांकडे वळला आणि जास्मिन वालियाचा आनंद टिपला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामुळे हार्दिक आणि जास्मिनच्या नात्याबद्दलच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत. या फोटोनंतर चाहते आता असा अंदाज लावत आहेत की हार्दिक पांड्या त्याच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आता या अभिनेत्रीला डेट करत आहे का?
हार्दिक पांड्या आणि जॅस्मिन वालिया यांनी दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर ग्रीसमधील एकाच ठिकाणचे फोटो पोस्ट केल्यापासून यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. चाहत्यांनी अंदाज लावणे सुरु केली की हे एकमेकांना डेट करत आहे. अद्याप दोघांनीही या नात्याबद्दल कोणतेही विधान केलेले नाही. पण चाहते या नवीन नात्याबद्दल आपापले अंदाज लावत आहे.