श्रेयस अय्यरनंतर शुभमन गिलनेही शतक झळकावल्यानंतर मोठा फटका मारल्याने त्याची विकेट गेली. त्याने 97 चेंडूत 104 धावांची खेळी केली. आपल्या खेळीत त्याने सहा चौकार आणि चार षटकार मारले. 35 षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 249 धावा आहे. श्रेयसने 90 चेंडूत 105 धावांची खेळी केली होती. शुभमन आणि श्रेयसमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 200 धावांची भागीदारी झाली. सध्या कर्णधार केएल राहुल आणि इशान किशन क्रीजवर आहेत.
श्रेयस अय्यरनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमवर शुभमन गिलची जादू पाहायला मिळाली. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे शतक आणि 92 चेंडूत एकूण नववे शतक झळकावले. वनडेतील सहा शतकांव्यतिरिक्त त्याने कसोटीत दोन शतके आणि टी-20मध्ये एक शतक झळकावले आहे. 33 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 230 धावा आहे. शुभमन 92 चेंडूत 100 धावा तर केएल राहुल 9 धावांवर फलंदाजी करत आहे. तत्पूर्वी, श्रेयस अय्यर 90 चेंडूत 105 धावा करून बाद झाला.