दरम्यानल, नवा स्वॉइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वॉइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल, असे चीनमधील अनेक विद्यापीठाने आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. नव्या स्वॉईन फ्लूला जी 4 असे नाव देण्यात आले आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी 2011 ते 2018 या कालावधीत संशोधन केले. तसेच यादरम्यान 10 राज्यांमधील 30 हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले.