ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथून दुःखद बातमी समोर आली आहे. १७ वर्षीय प्रतिभावान क्रिकेटपटू बेन ऑस्टिनचा अपघातात मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, मंगळवारी बेन त्याच्या क्लबच्या नेटमध्ये ऑटोमॅटिक बॉलिंग मशीनसमोर फलंदाजीचा सराव करत होता. त्याने हेल्मेट घातले होते, परंतु चेंडू त्याच्या डोक्याला आणि मानेला लागला. अपघातानंतर गंभीर अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे बुधवारी त्याचे निधन झाले.
	 
	क्लबने तीव्र दुःख व्यक्त केले
	फर्नट्री गली क्रिकेट क्लबने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, "बेनच्या निधनाने आम्ही पूर्णपणे हताश झालो आहोत. त्याचे नुकसान आमच्या संपूर्ण क्रिकेट समुदायाला खोलवर जाणवेल." क्लबने बेनचे वर्णन एक स्टार क्रिकेटपटू, एक हुशार आणि एक अद्भुत माणूस असे केले आहे. तो संघासाठी एक आशादायक गोलंदाज आणि फलंदाज होता, भविष्याबद्दल त्याला खूप आशा होत्या.