भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये सलग दोन शतके झळकावली आहे. लीड्समध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने शतक झळकावले, त्यानंतर आता त्याने एजबॅस्टन येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात शतक झळकावले आहे. गिलचे इंग्लंडविरुद्धचे हे सलग तिसरे कसोटी शतक आहे. या शतकी खेळीसह, त्याने इंग्लंडविरुद्ध सलग तीन शतके झळकावण्याच्या बाबतीत राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्याशी बरोबरी केली आहे.