पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंड संघ आघाडीवर आहे. लीड्स कसोटीत यजमान संघाने भारताचा पाच विकेट्सने पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या आणि पहिल्या डावात इंग्लंडला 465 धावांवर गुंडाळून सहा धावांची किरकोळ आघाडी मिळवली. भारताचा दुसरा डाव चौथ्या दिवशी364 धावांवर सर्वबाद झाला आणि एकूण 370 धावांची आघाडी घेत इंग्लंडला 371 धावांचे लक्ष्य दिले. शेवटच्या दिवशी इंग्लंडने सहज लक्ष्य गाठले आणि मालिकेत 0-1 अशी आघाडी घेण्यात यश मिळवले. दुसऱ्या डावात पाच विकेट्सवर 373 धावा करून इंग्लंडने विजय मिळवला.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचे 11खेळाडू:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.