भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान इंग्लंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. पहिली कसोटी गमावल्यानंतर, भारतीय संघ आता दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याकडे लक्ष देत आहे. दरम्यान, दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडने आपला प्लेइंग इलेव्हन जाहीर केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इंग्लिश संघाने आपल्या संघात कोणताही बदल केलेला नाही.
दुसऱ्या कसोटीपूर्वी सर्वात जास्त चर्चा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची आहे. एजबॅस्टन येथे होणाऱ्या या सामन्यात तो खेळेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, पुढील 24 तासांत बुमराहच्या तंदुरुस्तीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
बुमराहबद्दल ड्यूशने सांगितले की, जसप्रीत बुमराह निवडीसाठी उपलब्ध आहे. सुरुवातीपासूनच असे ठरले होते की तो या मालिकेतील पाचपैकी तीन सामने खेळेल. शेवटच्या कसोटीनंतर त्याला आठ दिवसांचा ब्रेक मिळाला. सध्याची खेळपट्टी, त्याची तंदुरुस्ती, कामाचा ताण आणि भविष्यातील सामने लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेऊ. सध्या कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.