क्रिकेटपटू मोहम्मद शमीला न्यायालयाने दिला मोठा आदेश, पत्नी आणि मुलीला एवढे लाखो रुपये द्यावे लागतील

बुधवार, 2 जुलै 2025 (09:38 IST)
क्रिकेटपटू मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि मुलीला दरमहा ४ लाख रुपये पोटगी देण्याचे निर्देश कलकत्ता उच्च न्यायालयाने दिले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा आदेश दिला आहे. न्यायालयीन लढाई दरम्यान मोहम्मद शमीला त्याची पत्नी हसीन जहाँ आणि वेगळी राहणाऱ्या मुलीला दरमहा ४ लाख रुपये पोटगी द्यावी लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कलकत्ता उच्च न्यायालयाने मंगळवारी हा निर्णय दिला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध शमीची पत्नी हसीन जहाँने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यापूर्वी, सत्र न्यायालयाने मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांच्या खटल्याची सुनावणी केली होती. या सुनावणीनंतर, न्यायालयाने २०२३ मध्ये शमीला त्याची पत्नी हसीन जहाँला ५०,००० रुपये आणि मुलीला ८०,००० रुपये देण्याचे निर्देश दिले होते. तथापि, शमीची पत्नी हसीन जहाँने या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले.

मार्च २०१८ मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आणि पोलिसांकडे तक्रारही दाखल केली. हसीन जहाँने शमीवर इतर महिलांशी संबंध आणि मॅच फिक्सिंगचा आरोपही केला. तथापि, आतापर्यंत यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे आणि त्यांना त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध कट रचल्याचे म्हटले आहे. हसीन जहाँ तिच्या मुलीसह शमीपासून वेगळी राहते. माहितीनुसार, दोघांचा घटस्फोटाचा खटला सुरू आहे.  
ALSO READ: IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने प्लेइंग 11 ची घोषणा केली,संघात कोणताही बदल नाही
Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती