अमृता आणि दिग्दर्शक – अभिनेता संदेश कुलकर्णीचं लग्न 2003 मध्ये झालं. आता या दोघांच्या लग्नाला19 वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला 19 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अमृताने गोड बातमी दिली आहे. अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रेग्नेंसी टेस्टचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिची प्रेग्नेंसी टेस्ट सकारात्मक आल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करुन अमृतानं लिहिलं, ओह, द वंडर बिगिन्सअमृताच्या या पोस्टनं अनेकांचं लक्ष वेधले आहे. यासह एका गर्भवतीची इमोजीही तिने पोस्टद्वारे शेअर केली आहे. तिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच कलाक्षेत्रामधील मंडळीही कमेंटच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत.
तुम्हीही अमृताचं अभिनंदन करायचा विचार करत असाल, तर जरा थांबा. कारण अमृताने जरी ही पोस्ट टाकली असली तरी ती प्रेग्नन्ट नाही. तर वंडर वूमनचित्रपटात तिची भूमिका असलेली जया प्रेग्नन्ट आहे. ”ही बातमी ऐकल्यावर सगळ्यांनीच मला शुभेच्छा दिल्या. पण मी नाही, तर जया प्रेग्नन्ट आहे”,अशी पोस्ट अमृताने केली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटातील सगळ्याच अभिनेत्रींनी आपापल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून आपली प्रेग्नन्सी जाहीर केली आहे. आणि या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. थोडक्यात, वंडर वुमेनया चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी ही आयडिया करण्यात आली आहे.
अमृतानं वळू, श्वास, विहीर, हापूस, किल्ला या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच गल्ली बॉयया हिंदी चित्रपटामुळे अमृताला विशेष लोकप्रियता मिळाली. सेक्रेड गेम्स – २,बॉम्बे बेगम्सआणि सास – बहू आचार प्रा.लीया वेब सीरिजमधील अमृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.