प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचं निधन

शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2023 (19:51 IST)
Instagram
तेजश्रीची आई (सीमा प्रधान) गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी असून त्यांनी  गुरुवारी 16 नोव्हेंबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आजारपणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या आजारपणामुळे त्या गेल्या काही दिवसांपासून अंथरुणाला खिळून असल्याचे सांगितले जाते. आईच्या निधनाने तेजश्रीच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तेजश्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात आईला सोबत घेऊनच केली होती. सलग तीन चित्रपटात काम करताना तिची आई सतत तिच्या सोबत असायची. 
  
तेजश्री सध्या स्टार प्रवाहवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच तेजश्रीची ऑनस्क्रीन सासूबाई म्हणजेच अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या घरी जाऊन भेट दिली होती. त्यावेळी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ सोबतचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तेजश्री ही प्रधान कुटुंबातली धाकटी मुलगी. शलाका आणि तेजश्री अशा त्यांना दोन मुली आहेत.
 
शलाकाला वाईल्डलाईफ फोटोग्राफीची आवड आहे. तर तेजश्रीने अभिनय क्षेत्राची वाट धरली. गोजिरवाण्या घरात या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पाऊल टाकले होते. या सर्व अभिनय क्षेत्राच्या वाटचालीत तिला आईची खंबीर साथ मिळाली होती. शशांक केतकर सोबत घटस्फोट झाल्यानंतर जवळच्याच नातेवाईकांकडून तिच्या आईला टोमणे खावे लागायचे. याला तेजश्रीच्या आईने चोख उत्तर दिले होते. त्यामुळे तेजश्रीच्या आयुष्यात तिच्या आईचे महत्व खूप होते. आईच्या निधनामुळे तेजश्री आता पूर्णपणे खचून गेली आहे. या दुःखातून सावरण्याचे तिला बळ मिळो हीच सदिच्छा…

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती