ठिपक्यांची रांगोळी घेणार प्रेक्षकांच्या निरोप

बुधवार, 8 नोव्हेंबर 2023 (19:51 IST)
स्टार प्रवाहची 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.गेल्या 2 वर्षांपासून ही मालिका प्रसारित होत असून  एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित या मालिकाने प्रेक्षकांच्या घरात आणि मनात स्थान निर्माण केले आहे. आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मालिकेतील अप्पू म्हणजे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने काही फोटो आणि व्हिडीओ सोशलमिडीयावर शेअर केले आहे. 

ऑक्टोबर 2021 साली स्टार प्रवाहवर ठिपक्यांची रांगोळी मालिका सुरु झाली. अप्पू, शशांक, माई, सुवा आई , दादा,विठू बाबा, पन्ना काकू, कुकी, बाबी आत्या, हे सर्व पात्र महाराष्ट्राच्या घर-घरात आणि प्रेक्षकांच्या मनात पोहोचले असून आता मालिका शेवटच्या टप्प्यात आली असून  या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस होता.

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिने एक भावुक पोस्ट करून व्हिडीओ शेअर केले आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा फोटो शेअर केला आहे. तिने सुमी म्हणजे अभिनेत्री नम्रता प्रधान सोबत मेकअपरूम मधला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पूर्वी 'लक्ष्मीच्या पाउलांनी' या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो आला असून 'सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या वेळी ही मालिका येणार असल्याचे समजले पण सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेचा वेळ बदलला असून ही मालिका रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता ठिपक्यांची रांगोळी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.     
 


Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती