Rashmika Mandanna Viral video : ती मुलगी कोण आहे जिचा चेहरा एडिट करून रश्मिकाचा व्हिडिओ व्हायरल केला जाणून घ्या

मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (19:25 IST)
अभिनेत्री रश्मिका मंधानाच्या व्हायरल व्हिडिओचा वादआणखी चिघळत आहे. अभिनेत्रीचा फेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन संतापले आणि त्यांनी व्हिडिओ एडिट करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही सोशल मीडिया वापरकर्त्यांना वेळीच सावध राहण्याचा इशारा दिला आहे,अखेर कोण आहे ही मुलगी जिचा चेहरा एडिट करून अभिनेत्री रश्मिका मंधानाचा चेहरा लावण्यात आला. हे महानायक बिग बी यांनी समोर आणले आहे. 

बिगबी अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री रश्मिका मंधानाचे समर्थन करत तिचा चेहरा असलेले व्हिडीओचे सत्य जगाच्या समोर आणले. त्यांनी त्यामुलीचे  आपल्या X अकाउंटवर खऱ्या मुलीचा व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की ही मुलगी ब्रिटिश-भारतीय मुलगी झारा पटेल आहे.

क्लिपसोबत अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, माहिती. वास्तविक, हा खरा व्हिडीओ पत्रकार अभिषेकने या मुलीचा  व्हिडिओ आपल्या X अकाउंटवर सर्वप्रथम शेअर केला होता, ज्याने रश्मिकाच्या चेहऱ्याच्या बनावट व्हिडिओची जगाला जाणीव करून दिली होती.
 
हा मूळ व्हिडिओ 9ऑक्टोबर रोजी  पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एडिट करण्यात आला आणि व्हायरल झाला. हे कृत्य कोणी केले याचा तपास अद्याप लागलेला नाही.
 
हा व्हिडिओ 'आर्टिफिशियल इंटेलिजेंस' म्हणजेच AI तंत्रज्ञानाच्या मदतीने बनवण्यात आला आहे. यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, एआय सारख्या प्लॅटफॉर्मला सामोरे जाण्याची गरज आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला कायदेशीर बंधन म्हणून नियमांचे पालन करावे लागेल. सर्व प्लॅटफॉर्मने हे सुनिश्चित केले पाहिजे की कोणत्याही वापरकर्त्याद्वारे कोणतीही खोटी माहिती पोस्ट केली जाणार नाही.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नियमांचे पालन न केल्यास कायद्याचा नियम 7 लागू केला जाईल. आयपीसीच्या तरतुदींनुसार पीडित व्यक्तीला या व्यासपीठावर न्यायालयात नेले जाऊ शकते. बॉलीवूड अभिनेता  अमिताभ बच्चन यांनी एक्स अकाउंटवर ट्विट करून व्हिडिओ संपादित करून लीक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.










Edited by - Priya Dixit   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती