खासगी क्षेत्रातील उद्योगांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे देशातील उद्योजकांसाठी निरनिराळ्या क्षेत्रात संधीची त्सुनामी आल्याचं विधान रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी केलं आहे. 22 व्या आंत्रेप्रिनर ऑफ द इयर या पुरस्कार सोहळ्यात बोलताना अंबानी यांनी भारत आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक शक्तीच्या रुपात वेगानं पुढं जात असल्याचंही म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या भविष्यातील विकासामध्ये खासगी क्षेत्राच्या भूमिकेचं स्वागत करतात. दुसरं म्हणजे भारतात तंत्रज्ञानाची उपलब्धता आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून 1.3 अब्ज भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात. याच दोन कारणांमुळे मला भारतात उद्योजकांसाठी संधीची त्सुनामी असल्याचा विश्वास आहे, असं मुकेश अंबानी यांनी म्हटलं.