शेयर बाजाराने इतिहास घडवला, पहिल्यांदा सेन्सेक्स 36,000 पार

मंगळवार, 23 जानेवारी 2018 (12:54 IST)
मुंबई - मागच्या काही दिवसांपासून शेअर बाजारात असलेली तेजी कायम असून मंगळवारी सकाळी बाजार उघडताच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने प्रथमच 11 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टी 11,018 अंकांवर पोहोचला. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी रोज नवनवे उच्चांक नोंदवत आहे. बीएसई सेन्सेक्स 214 अंकांची उसळी घेत 36 हजार पार पोहोचला.                                  
 
कालही बाजार खुलताच क्षणी सेन्सेक्स 100 अंकांनी वाढला, तर निफ्टीनंही 10910 या नव्या आकड्याला गवसणी घातली होती. जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले तेजीचे वातावरण, आगामी अर्थसंकल्पाकडून बाजाराला असलेल्या अपेक्षा, परकीय, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली मोठी गुंतवणूक आणि विविध आस्थापनांकडून आगामी काळामध्ये जाहीर होणारे निकाल यामुळे शेअर बाजार तेजीत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती