बँका सलग तीन दिवस बंद

मंगळवार, 23 जानेवारी 2018 (09:09 IST)

बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही बँकेचे व्यवहार करु शकणार नाहीत तसेच एटीएममध्येही पैशांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.  शुक्रवारी म्हणजेच २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असणार आहे. त्यानंतर महिन्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील तर रविवारीही बँकांना सुट्टी असते. बँकांना सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने चेक क्लेअर होण्यातही वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच एटीएममध्येही पैशांची कमतरता भासण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला रोकड व्यवहार करायचा असेल तर २५ जानेवारीपर्यंत व्यवस्था करुन ठेवा अन्यथा व्यवहार करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती