सोन्याच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात घट झाली आहे.दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमचा दर ३०,९५० रुपयांवर पोहोचला आहे.
 
सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात २७० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३०,९५० रुपये आणि ३०,८०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती