प्रत्यक्षकर भरण्यात पुणे विभाग देशभरात पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विभागाने करभरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून, आतापर्यंत 75 टक्के करभरणा झाला आहे, तर एकूण ग्रोथ कलेक्शनमध्ये पुणे विभागाचा दुसरा, तर हैदराबादचा पहिला क्रमांक आहे, अशी माहिती पुण्याचे मुख्य प्राप्तिकर अधिकारी ए.सी. शुक्ला यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्ला म्हणाले, 2017-18 या आर्थिक वर्षात एकूण बजेटच्या 75 टक्के कर पुणेकरांनी भरला आहे. हा देशातील सर्वात जास्त करभरणा आहे. पहिल्या पाच प्रदेशात पुणे विभाग हा अव्वल ठरला आहे, तर देशातील एकूण ग्रोथ कलेक्शनमध्ये हैदराबाद प्रथम क्रमांकावर असून, पुणे द्वितीय क्रमांकावर आहे.