पुन्हा एस बी आयचा धक्का खातेधारक लक्ष द्या

बुधवार, 31 ऑक्टोबर 2018 (19:16 IST)
द स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे देशातील काही मोठ्या बँकांच्या यादीत येणाऱ्या काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. येत्या दोन महिन्यांमध्ये बँकेकडून ठराविक चार सेवा बंद करणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे डेबिट कार्ड धारक, ऑनलाईन बँकिंग सेवा इत्यादींचा वापर करणाऱ्या खातेधारक प्रभावित होतील. निर्णयांमध्ये बँकेकडून पैसे काढण्याच्या आकड्यावरही निर्बंध लावण्यात आले आहेत. ३१ ऑक्टोबरनंतर क्लासिक आणि माएस्ट्रो डेबिट कार्ड धारक दर दिवशी आपल्या खात्यातून फक्त २० हजार रुपये इतकीच रोकड काढू शकणार आहेत. बँकेकडून घेण्यात आलेल्या या निर्णयापूर्वी खातेधारकांना दर दिवशी ४० हजार रुपयांपर्यंतची रोकड काढता येत होती. महत्त्वाचे बदल करण्यात आले असून रोकड काढण्याचा आकडा कमी करण्यात आला आहे आता फक्त २० हजार काढता येणार आहे. बँकेच्या या अनेक जाचक नियमांमुळे अनके ग्राहक वैतागले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती