केंद्रीय सांख्यिकी विभागानुसार, महागाईचा हा दर ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) अवलंबून असतो. जून महिन्यातही यात ४.९२ टक्के घसरण दिसून आली होती. सांख्यिकी विभागानुसार भाजीपाल्याच्या दरात जूनच्या तुलनेत (-) २.१९ टक्क्यांची घसरण दिसून आली होती. जून महिन्यात हा दर ७.८ टक्के इतका होता. फळांच्या दरातही घसरण झाली आहे. जून महिन्यात हाच दर १० टक्के इतका होता. मांस, मासे आणि दूधाच्या दरातही जुलै महिन्यात घसरण दिसून आली.