पोलिसांना मोफत भाजी दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलाला तुरुंगात टाकले

बिहार येथे लज्जास्पद घटनेत पोलिसांना फुकट भाजी न दिल्यामुळे एका अल्पवयीन मुलाला अटक केली गेली. 14 वर्षीय हा मुलगा तीन महिन्यांपासून बेउर जेल येथे कैदा आहे. या घटनेवर हल्ला झाल्यानंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सक्ती दाखवत चौकशी आदेश दिले आहेत.
 
19 मार्च ला पटना येथील पत्रकार नगर येथे पोलिसांना मोफत भाजी दिली नाही म्हणून अल्पवयीन मुलावर चोरीचा आरोप लावत त्याला तुरुंगात टाकले. ही घटना सीसीटीव्हीत रेकॉर्ड झाली.
 
पोलिसांचा दावा आहे की आरोपीला बाइक लिफ्टर समूहाच्या सदस्यांसह पकडण्यात आले होते. मुलाच्या वडिलांनी या प्रकरणात सीएम, राज्यपाल आणि पोलिस अधिकार्‍यांना पत्र लिहून मदत मागितली आहे.
 
अल्पवयीन आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की पोलिस पेट्रोलिंग दरम्यान येतात आणि फुकट भाजी घेऊन जातात. एकदा मोफत भाजी दिली नाही तर माझ्या मुलाला धमकी दिली होती. नंतर त्यांनी माझ्या मुलावर बाइक लूटचा खोटा आरोप लावून कोठडीत टाकले.
 
मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहे की पोलिस महानिरीक्षक स्तराचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील आणि दोन दिवसात रिपोर्ट प्रस्तुत करतील. नंतर त्वरित कार्रवाई करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती