Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर, जाणून घ्या आजचे दर

Webdunia
शनिवार, 26 नोव्हेंबर 2022 (12:50 IST)
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या  दरात चढ-उतार होत असताना ,  भारतीय तेल कंपन्यांनी २६ नोव्हेंबरलाही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशभरात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही,
 
भारतीय तेल कंपन्यांनी 21 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. आज (शनिवार) 26 नोव्हेंबर 2022 रोजी देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर  96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलचे दर 89.62 रुपये इतकेच आहे.  मुंबईत पेट्रोलचे दर 106.31 तर डिझेलचे दर   94.27रुपये इतकेच आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 106.03 तर डिझेलचे दर  92.76रुपये इतकेच आहे. चेन्नईत  पेट्रोलचे दर 102.63 तर डिझेलचे दर 94.24 रुपये इतकेच आहे. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या आधारावर, तेल विपणन कंपन्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती निश्चित करतात. इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात मात्र, अनेक दिवसांपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम आहेत. 

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख