एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू

गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (17:02 IST)
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे नवीन वेतनवाढीनुसार मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने गुडन्यूज दिली आहे. (Good news to ST employees) एसटी कर्मचाऱ्यांना नवीन वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन हे नवीन वेतनवाढीनुसार मिळणार आहे. 
 
महामंडळाने काढलेल्या परिपत्रकात सुधारित वेतनवाढीनुसार नव्याने नियुक्ती मिळालेल्या आणि 10 वर्षांच्या कर्मचाऱ्यांना 5 हजार रुपयांची वाढ केली आहे. 10 ते 20 वर्षांपर्यंतची सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना 4000 रुपयांची पगारवाढ, तसेच 20 वर्षांपेक्षा अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांना 2 हजार 500 रुपये पगारवाढ दिल्याचे नमूद केले आहे. याशिवाय 28 टक्के महागाई भत्ताही देण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन हे दर महिन्याच्या सात तारखेला होते. जे कर्मचारी कर्तव्यावर आहेत, त्यांनाच नवीन वेतनवाढ मिळेल.
 
दरम्यान काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप सुरुच आहे तर काही कर्मचारी सरकारच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर कामावर रुजू झाले आहेत. कामावर रुजू झालेल्या कर्मचार्‍यांचे निलंबन मागे घेण्यात येणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती