LPG Price: कमर्शिअल एलपीजी सिलेंडर 209 रुपयांनी महाग, आजपासून नवीन दर लागू

Webdunia
रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (11:31 IST)
LPG Price: ऑक्‍टोबर महिना सुरू होताच महागाईने जोर धरला आहे. महिन्याची सुरुवात पहिल्याच दिवशी महागाईच्या धक्क्याने झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वास्तविक, 1 ऑक्टोबर 2023 पासून एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे.

19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 209 रुपयांनी महागला आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. नवीन दर रविवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1731.50 रुपये होईल.
 
1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 158 रुपयांनी कमी केल्या होत्या. यानंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,522 रुपयांवर आली. ऑगस्टच्या सुरुवातीलाही तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती 99.75 रुपयांनी कमी केल्या होत्या. 
 




Edited by - Priya Dixit  
 
 
 

संबंधित माहिती

पुढील लेख