Domestic Gas Cylinder Price : केंद्र सरकारची राखी-ओणमनिमित्त जनतेला भेट; घरगुती गॅस सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त

मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (17:16 IST)
Domestic Gas Cylinder Price :घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर 200 रुपये सबसिडी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणमच्या दिवशी मोठी घोषणा केली आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीत सर्व ग्राहकांना 200 रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाईल.

उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आधीपासून मिळत असलेल्या 200 रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त 200 रुपये वेगळे अनुदान दिले जाईल. म्हणजेच त्यांना गॅस सिलिंडरवर 400 रुपयांची सूट मिळणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली.
 
केंद्रीय मंत्री म्हणाले की उज्ज्वला योजनेंतर्गत लोकांना गॅस सिलिंडरवर 200 रुपये वेगळे अनुदान दिले जाईल. म्हणजेच त्यांना आधीच मिळत असलेल्या 200 रुपयांच्या अनुदानाव्यतिरिक्त 200 रुपयांचे अतिरिक्त अनुदान दिले जाईल. या प्रकरणात, त्यांना एकूण 400 रुपयांच्या अनुदानाचा दुहेरी लाभ मिळेल. याआधी 1 ऑगस्ट रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कपात केली होती.

रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शनही दिले जाणार आहेत. त्यांना पाईप आणि स्टोव्हही मोफत दिला जाणार आहे. पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, गॅस सिलिंडर पुन्हा एकदा स्वस्त झाले आहेत, पंतप्रधानांनी राखी आणि ओणमच्या दिवशी देशातील करोडो भगिनींना भेटवस्तू दिली आहेत.मंत्रिमंडळ बैठकीचे वर्णन करताना अनुराग ठाकूर म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झाली. 
 






Edited by - Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती