वार्षिक सर्वसाधारण सभेत कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्लांटची माहिती देताना मुकेश अंबानी म्हणाले, “आम्ही बाराबंकी, उत्तर प्रदेश येथे विक्रमी 10 महिन्यांत प्लांट उभारला आहे, आम्ही भारतभर आणखी 25 प्लांट वेगाने उभारू. पुढील 5 वर्षात 100 पेक्षा जास्त प्लांट्स उभारण्याचे आमचे ध्येय आहे. या प्लांट्समध्ये 55 लाख टन शेतीचे अवशेष आणि सेंद्रिय कचरा वापरला जाईल. त्यामुळे सुमारे 20 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होऊन दरवर्षी 25 लाख टन सेंद्रिय खत तयार होईल.