महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती गॅस सिलिंडर आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सिलिंडरवर प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी वितरण कंपन्यांनी स्वयंपाकाच्या गॅस किंवा एलपीजीच्या किमतीत प्रति सिलेंडर 50 रुपयांची वाढ जाहीर केली. उज्ज्वला आणि सामान्य श्रेणीतील ग्राहकांसाठी गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले. नवीन किमती आज मध्यरात्रीपासून लागू होतील.
सामान्य ग्राहकांसाठी 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 803 रुपयांवरून 853 रुपये होईल आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत येणाऱ्या ग्राहकांसाठी 14.2 किलो सिलिंडरची किंमत 503 रुपयांवरून 553 रुपये होईल.
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, "एलपीजी सिलेंडरच्या प्रति सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ होईल. 500 रुपयांवरून ते 550 रुपयांपर्यंत (पीएमयुवाय लाभार्थ्यांसाठी) आणि इतरांसाठी ते 803 रुपयांवरून 853 रुपयांपर्यंत जाईल.