पीएनबीच्या करोडो ग्राहकांना मोठा झटका,बँकेने व्याजदरात कपात केली

बुधवार, 6 एप्रिल 2022 (17:36 IST)
नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. पीएनबीने बचत खात्यावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. बँकेने घेतलेल्या या निर्णयाचा देशातील करोडो ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
 
पंजाब नॅशनल बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 10 लाख रुपयांपेक्षा कमी खातेधारकांना आता 2.70 टक्के दराने व्याज मिळणार आहे. तर, 10 लाख ते 500 कोटी रुपयांपर्यंतच्या खातेधारकांना 2.75 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळेल.
 
बँकेने जारी केलेले नवीन दर 4 एप्रिलपासून लागू झाले आहेत. या बदलाचा परिणाम देशांतर्गत ग्राहकांसोबतच एनआरआय ग्राहकांवरही होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
 
पंजाब नॅशनल बँकेने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही व्याजदर कपातीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बँकेने 10 लाखांपेक्षा कमी असलेल्या खात्यांवरील व्याजाची रक्कम 2.75 टक्के कमी केली होती. त्याच वेळी, 10 लाख ते 500 कोटी रुपयांच्या बचत खात्यावरील व्याजदर 2.80 टक्के करण्यात आला आहे. 
 
4 एप्रिल 2022 पासून बँकेत पॉझिटिव्ह पे सिस्टम  प्रणाली अनिवार्य झाली आहे . जर कोणत्याही ग्राहकाने बँकेच्या शाखेतून किंवा डिजिटल चॅनलद्वारे ₹ 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे धनादेश जारी केले, तर त्यांच्यासाठी PPS पुष्टीकरण आवश्यक असेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती