पेट्रोल-डिझेलच्या दरांनी घेतला पेट, तेल 10 रुपयांनी महागलं

बुधवार, 6 एप्रिल 2022 (07:04 IST)
Petrol Diesel Price Today 6th April: नवीन इंधन दर जाहीर करण्यात आले आहेत. बुधवारी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ करण्यात आली. या वाढीनंतर 16 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत पेट्रोलचा दर 104.61 रुपये प्रति लिटरवरून 105.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.87 रुपयांवरून 96.67 रुपये प्रति लिटर झाला आहे. 
 
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देशभरात वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करानुसार त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. जवळपास 137 दिवस स्थिर राहिल्यानंतर 22 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर 14व्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 10 रुपयांनी वाढ झाली आहे.
 
श्रीनगरपासून कोचीपर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आता १०५ रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये डिझेलने शतक ओलांडले आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये डिझेल सर्वात महाग म्हणजे 107.11 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. त्याचवेळी, राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक म्हणजे 122.93 रुपये प्रति लिटर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती