Edible Oil Price: खाद्य तेल झाले स्वस्त

मंगळवार, 5 एप्रिल 2022 (17:07 IST)
विदेशी बाजारातील घसरणीच्या ट्रेंडमध्ये आर्थिक वर्षाच्या शेवटी वार्षिक खाती बंद झाल्यामुळे मर्यादित व्यापारामुळे, गेल्या आठवड्यात देशभरातील जवळपास सर्व तेल-तेलबिया बाजार तोटा दर्शवत बंद झाले.

दुसरीकडे, सामान्य मागणीमुळे सोयाबीन तेलबियांच्या किमतीत सुधारणा झाली.बाजारात सोयाबीन, पाम, सनफ्लॉवर या तेलात घट झाल्यामुळे सर्वसामान्याला सुखावणारी बातमी आहे. 
 
गेल्या आठवड्यात खाती वार्षिक बंद झाल्यामुळे मर्यादित व्यापारामुळे किंमती घसरल्या.
शेंगदाणा सॉल्व्हेंट रिफाइंड गेल्या आठवड्याच्या तुलनेत प्रति क्विंटल 10 रुपयांनी घसरला.
मंडईंमध्ये आवक वाढल्याने मोहरी तेल आणि तेलबियांच्या दरात घसरण झाली आहे, तर कच्चे पाम तेल आणि पामोलिन तेलाच्या दरातही घसरण दिसून आली आहे.
सध्या सोयाबीनचा तुटवडा ब्राझील, दक्षिण अमेरिका या देशात उत्पादन घातल्यामुळे झाला असून चीन, इराण कडून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 
 
या तीन महिन्याचे तेलाचे दर खालील प्रमाणे आहे.
सोयाबीन तेलाचा भाव जानेवारी महिन्यात 122 ते 152 रुपये होता.तर फेब्रुवारीत तेलाचे दर वधारले असून 147 ते 177 रुपये झाले. तर मार्च महिन्यात 158 ते 188 होते. शेंगदाणा 132 -162 रुपये ,फेब्रुवारी मध्ये 157-197 तर मार्च महिन्यात 165 -210 होता.करडईचे तेल 152 -182 रुपये ,फेब्रुवारी महिन्यात 177-210 रुपये तर मार्च महिन्यात 180 - 220 चा भाव होता. पामतेलाचे दर जानेवारी महिन्यात 117 -147 फेब्रुवारीत 142 - 172 रुपये तर मार्च मध्ये 140 - 170 रुपये होते. सूर्यफुलाच्या तेलाचे दर जानेवारी महिन्यात 132 ते 162 रुपये , फेब्रुवारी महिन्यात 157 -187 तर मार्च महिन्यात 165 - 210 रुपये होते.
जरी तेलाचे दर कमी झाले आहेत तरी ही उन्हाळ्यात आपल्या आहारात तेलाचा वापर जपून करायला आहार तज्ञानी सांगितले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती