Gold-Silver Price Today: स्वस्त झाले सोने-चांदी, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

शनिवार, 22 एप्रिल 2023 (15:44 IST)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ असते. हे धन लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि  अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळालेले धन कायम तुमच्यासोबत राहते. या दिवशी कोणतेही काम केले तरी त्याचे फळ अक्षय्य राहते. आणि कोणते ही शुभ काम करतात. साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे अक्षय्य तृतीया .यामुळे लोक अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करतात आणि घरी आणतात सोनं  खरेदी करायचे असेल तर आजचे दर जाणून घ्या .
भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो 74 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60,446 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 74,763 रुपये आहे. आज अक्षय्य तृतीयेचा सण आहे. या प्रसंगी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची वेळ 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 07.49 ते 23 05.48 पर्यंत असेल. जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर दर एकदा नक्की पहा. 
 
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव गुरुवारी संध्याकाळी 60,616 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो शुक्रवारी  सकाळी 60,446 रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे शुद्धतेच्या आधारे सोने-चांदी स्वस्त झाले आहेत.
 
995 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज सकाळी 60,204 रुपयांपर्यंत खाली आली आहे.916 शुद्धतेचे सोने आज 55369 रुपये झाले आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या सोन्याचा भाव 45335 वर आला आहे 585 शुद्धता असलेले सोने आज स्वस्त झाले असून ते 35,361 रुपयांवर आले आहे. याशिवाय 999 शुद्धतेच्या एक किलो चांदीचा दर आज 74763 रुपये झाला आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती