2001 ते 2011 या कालावधीत तयार झालेल्या गाड्या कंपनीने ग्राहकांकडून परत मागवल्या आहे. यात सी-क्लास, सीएलके-क्लास, सीएलएस क्लास आणि ई-क्लास या गाड्यांचाही समावेश आहे.
ग्लास पॅनल आणि स्लायडिंग रूम फ्रेममध्ये तांत्रिक दोष असल्याने गाड्या परत मागवल्याचे कारण कंपनीने सांगितले आहे. या तांत्रिक दोषामुळे गाडीला देण्यात आलेले सनरुफ डिटॅच होऊ शकते. असे झाल्यास प्रवास करणाऱ्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याची गंभीर दखल घेत कंपनीने या गाड्या परत मागवल्या आहेत.