ऑइल मार्केटिंग कंपनीने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आजपासून 19 रुपयांनी कमी झाली आहे. मात्र घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 19 किलोचा ईण्डेन LPG गॅस सिलिंडर आता 1,745.50 रुपये आहे. मुंबईत आता सिलिंडर 1698.50 रुपयांना मिळणार आहे आधी किंमत 1717.50 रुपये होती. कोलकाता मध्ये व्यावसायिक सिलिंडर आता 1859 रुपयांना मिळणार आहे. या पूर्वी सिलिंडर 1879 रुपयांना मिळत होता. चैन्नईत व्यावसायिक सिलिंडर आता 1930 रुपये ऐवजी 1911 रुपयांना मिळणार आहे.
पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याला पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या व्यावसायिक आणि घरगुती सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत 1 मेपासून त्यांच्या किमतीत बदल होईल, अशी अपेक्षा होती. देशात लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत काय बदल होतो याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी 1 एप्रिल रोजी तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोच्या एफटीएल (फ्री ट्रेड एलपीजी) सिलेंडरच्या किमती कमी केल्या होत्या. सूत्रांनी सांगितले की, मोदी सरकार ने सहा महिन्यात दुसऱ्यांदा एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे.