महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प वित्तमंत्री अजित पवार विधानसभेत सादर केला आहे. या अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांच्या दृष्टीने या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत, यात 3 लाखापर्यंत पीककर्ज घेणाऱ्या नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळकटीकरणासाठी 4 वर्षासाठी 2 हजार कोटींची घोषणा केली आहे. तसेच राज्यात आरोग्य सेवांसाठी 7,500 कोटींची तरतूद आणि नागरी आरोग्य कार्यालयाची निर्मिती करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली.
अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा
आरोग्य सेवांसाठी 7500 कोटींची तरतूद
सरकारी रुग्णालयांत आग रोधक उपकरणे लावण्यात येतील.
सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, रायगड, साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारणार
कोरोना काळात औद्योगिक काळात घट झाली, परंतू बळीराजाने तारले. शेतमालाचा व्यवहार पारदर्शी करण्यासाठी शासन प्रयत्नात
शेतकऱ्यांना तीन लाख रुपये पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आणि ज्यांनी हे कर्ज वेळेत भरले त्यांना शून्य़ टक्के व्याजदराने कर्ज मिळणार. व्याज राज्य सरकार भरणार
कर्जमुक्तीनंतर ४२ हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज शेतकऱ्यांना देण्यात आलं