मुंबईत रविवारी १,३६१ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत. गेल्या १३१ दिवसांतील मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा हा सर्वाधिक आकडा आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी शहरात कोरोनाचा उद्रेक आटोक्यात न आल्यास लवकरच मुंबईत अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोरोना रुग्ण वाढीची माहिती बैठकीत सादर केली असून वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षाही आता अधिक रुग्ण वाढत असल्याची माहिती देण्यात आली. त्यासोबतच अंशत: लॉकडाऊन बाबतही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.