एक हजारची नोट चलनात आणण्याचा विचार नाही : जेटली

नोटाबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने दोनशे रूपयांची नोट चलनात आणली आहे. तसेच ५० रूपयांची नोटही नव्या रूपात चलनात येणार आहे. ५० आणि २०० रूपयांची नोट एटीएममध्ये येण्यास वेळ लागणार आहे. अशात १ हजार रूपयांची नवी नोट चलनात येणार आहे अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र एक हजार रूपयांची नोट चलनात आणण्याचा काहीही विचार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी ही माहिती दिली आहे.
 
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ५०० आणि १ हजार नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५०० आणि २ हजार रूपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या. ५० आणि २०० रूपयांचीही नोट चलनात आणली गेली आहे. त्यानंतर १ हजार रूपयांचीही नोट चलनात आणली जाईल अशी चर्चा सुरू होती. मात्र ही एक हजाराची नवी नोट चलनात आणण्याचा काहाही विचार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती