नोटांवरून गांधीजी गायब

नोटबंदीमुळे रोज नवीन-नवीन किस्से समोर येत असताना एक विचित्र प्रकरण श्योपुर जिल्ह्यात समोर आले आहे. येथे तर दोन हजाराच्या नोटांवरून चक्क गांधीजी गायब होते.
 
हे प्रकरण मध्यप्रदेशातील श्योपुर जिल्ह्यातील बडौदा तहसिलाचे आहे.  येथील एसबीआय ब्रांचमध्ये दोन शेतकर्‍यांना भुगतान करताना बँकेने गांधीचे फोटो नसलेल्या 2000 च्या नोटा पकडवून दिल्या. नोटा घेऊन जेव्हा शेतकरी बँकेतून बाहेर पडला तर या नोटा बघून हैराण झाला. आधी तर तो घाबरला नंतर लोकांना सांगितलं तर हल्ला झाला.
सूत्रांप्रमाणे लक्ष्मण मीणा आणि गुरमीतसिंग मीणा आपल्या बँक खात्यातून आठ-आठ हजार रुपये काढून बाहेर पडले. त्यांना बँकेने दोन-दोन हजाराच्या चार-चार नोटा दिल्या होत्या. शेतकर्‍यांनी बाहेर पडल्यावर जेव्हा नोटा काढून बघितल्या तर ही चूक कळून आली.
 
ते लगेच पुन्हा बँकेत गेले आणि नोटा दाखविल्या. बँक प्रबंधनने चेक केल्यावर चूक कळून आली. त्यांनी लगेच त्रुटी असलेल्या नोटा परत घेतल्या आणि बदलून दुसर्‍या नोटा दिल्या. या पूर्ण प्रकरणाबद्दल बँक मॅनेजरने वक्तव्य देण्यास नकार दिला.

वेबदुनिया वर वाचा