दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याचा किंवा नोट हळूहळू चलनातून हद्दपार करण्याचं सरकारचं काहीही नियोजन नसल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे.
सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने किंवा आरबीआयने दोन हजार रुपयांची नोट बंद होण्याबाबत काहीही संकेत दिलेले नाहीत, तर नोट बंद करण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल अरुण जेटलींनी केला. दोन हजार रुपयांची नोट बंद होईल, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. शिवाय या नोटेची छपाई बंद केली असल्याचीही चर्चा होती. मात्र आरबीआयने या नोटेची छपाई बंद केलेली नाही आणि नोट बंद करण्याचं काहीही नियोजन नसल्याचं यापूर्वी अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनीही स्पष्ट केलं होतं.