नैसर्गिकरित्या केसांना वाढवण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कुरळ्या केसांना अधिक ओलाव्याची गरज असते. तर स्ट्रेट केसांना कंडिशनरची गरज असते. याकरिता वेळोवेळी आपल्या केसांचे ट्रिमिंग करावे. यामुळे रुक्ष आणि दोनतोंड आलेले केस निघून जातील व केसांची वाढ देखील होईल. याशिवाय कर्लिंग आयरन, ब्लो ड्रायर आणि स्ट्रेटनर यांचा जास्त उपयोग करू नये. यामुळे केसांना नुकसान होते आणि त्यांची वाढ थांबते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्यमाहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता,विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.