फॉलो करा हे 5 Tricks, अधिक काळ लिपस्टिक टिकून राहील

शनिवार, 16 एप्रिल 2022 (09:14 IST)
अनेकदा घरातून लिपस्टिक लावून आपण पर्फेट तयार होऊन बाहेर पडतो पण ज्या फंक्शनच्या ठिकाणी पोहचण्याआधीच लिपस्टिक फिकट पडू लागते. वारंवार लिपस्टिकची 
 
परत चढवल्यावर ओठ चांगले दिसत नाही. अशात लिपस्किट अधिक काळ टिकवायची असेल तर महागडी लिपस्टिक खरेदी करावी लागते तरी निराशा हाती येते. अशात काही ट्रिक्स अमलात आणून आपण यावर उपाय करु शकतात.
 
1. लिपस्टिक ‍अधिक काळ टिकावी यासाठी लावण्यापूर्वी स्टीक फ्रीजमध्ये ठेवावी. तयार झाल्यावर सगळ्यात शेवटी लिपस्टिक लावावी.
 
2. आपल्या ओठांवर आधी हलकं फाउंडेशन लावावं. नंतर लिपस्टिक लावावी. याने लिपस्टिक अधिक काळ टिकते.
 
3. लिप लायनर लावताना पूर्ण ओठांवर लावावं. नंतर लिपस्टिक लावावी. याने जास्त वेळे टिकेल.
 
4. लिपस्टिक लावल्यानंतर टिश्यू पेपर दोन्ही ओठांच्यामध्ये ठेवून हलक दबावं याने मेट लुक येतो. 
 
5. आपल्या ओठांची काळजी घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी बेंबीत नारळाचं तेल घालावं. याने ओठ नरम राहण्यास मदत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती