दिवसभर उन्हात फिरून डोळे लाल होतात, या टिप्स अवलंबवा
मंगळवार, 12 एप्रिल 2022 (22:46 IST)
सूर्यप्रकाश किंवा धूळ आणि मातीच्या संपर्कात आल्याने डोळे लाल होऊ लागतात. याशिवाय कधी कधी डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये खाज सुटणे किंवा जळजळ होऊन किंवा संसर्ग झाल्यामुळे ते लाल दिसू लागतात. अशा स्थितीत डोळ्यात जळजळ होणे, चुणचुण होणे. आदी समस्याही होऊ लागतात.अशा परिस्थितीत आज डोळे लाल होण्यावर काही घरगुती उपाय सांगत आहोत या टिप्स अवलंबवून डोळ्याचा लालपणा दूर करू शकता.
डोळे लाल होण्याची कारणे
* बराच वेळ उन्हात राहणे
* घाण, धूळ, डोळ्यात साचणे
* डोळ्याभोवती रक्तवाहिन्या सुजणे
* डोळ्यांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असणे
* बॅक्टेरिया किंवा विषाणूंमुळे डोळे लाल होऊ शकतात आणि सुजतात
* सर्दी, फ्लू किंवा ताप येणे
* कोरडी हवा वाहणे
डोळे लाल होण्यावर घरगुती उपाय
* आईस पॅक -जरआपले डोळे लाल झाले असतील किंवा त्यात जळजळ आणि खाज येत असेल तर आपण आइस पॅक वापरू शकता. हे बाजारात सहज मिळेल. बंद डोळ्यांवर 3-5 मिनिटे आईस पॅक ठेवा. यामुळे डोळ्यांची जळजळ, चुणचुण, खाज शांत होईल. डोळे लाल होणे आणि सूज येण्याच्या समस्येपासूनही आराम मिळेल.
* काकडी- डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी काकडीचा वापर करू शकता. यासाठी काकडीचे गोल काप करून काही वेळ डोळ्यावर ठेवा. दिवसातून 2-3 वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा. काकडीमध्ये असलेले कुलिंग गुणधर्म रक्तवाहिन्यांमधील सूज कमी करतात आणि डोळ्यांचा लालसरपणा दूर करतात.
* मध आणि दूध- डोळ्यांच्या लालसर होण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मध आणि दुधाचाही वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात 1-1 चमचे थंड दूध, मध घ्या. यानंतर, मिश्रणात कॉटन पॅड बुडवा आणि 5-10 मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवा. यानंतर चेहरा ओल्या कपड्याने किंवा थंड पाण्याने धुवा. दिवसातून 2-3 वेळा असे केल्याने डोळ्यांना आराम वाटेल.
* कोरफड जेल-कोरफडचे रोपटे प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत, जर ते तुमच्या घरी देखील असेल तर सुजलेले डोळे, डोळ्याची जळजळ, दुखणे, लाल होणे इत्यादी समस्या दूर करू शकता. यासाठी एका भांड्यात 2 चमचे कोरफड जेल आणि थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये मिसळा. नंतर 2 तास फ्रीजमध्ये ठेवा. यानंतर, कापसाचा बोळा मिश्रणात बुडवा आणि 10 मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवा. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म लाल डोळ्यांच्या समस्येपासून आराम मिळवण्यास मदत करतात.
* बटाटा- डोळ्यांशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आपण बटाट्याचाही वापर करू शकता. यामध्ये असलेले आस्ट्रिजन्ट गुणधर्म डोळ्यांभोवती असलेल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावण्यास मदत करतात. असं केल्याने डोळ्यांची जळजळ, चुणचुण होणे, डोळे लाल होणे इत्यादीपासून आराम मिळतो. यासाठी बटाटे पातळ कापून 10 मिनिटे बंद डोळ्यांवर ठेवा. दिवसातून 2 वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा. काही दिवसातच फरक जाणवेल.