सौंदर्य खुलवण्यासाठी दुधाची साय, चमकदार त्वचेसाठी फायदे जाणून घ्या

मंगळवार, 1 नोव्हेंबर 2022 (12:31 IST)
दुधावरील साय तुमच्या चेहऱ्यावर कसे काम करते हे माहित नसेल तर त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तुम्ही त्याचा योग्य वापर केला पाहिजे.
 
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही महागड्या सौंदर्य उत्पादनांचा अवलंब करता असाल तर हे जाणून घ्या की फ्रीजमध्ये ठेवलेली सायची मदत त्यापेक्षा कितीतरी पट चांगले परिणाम देऊ शकते.
 
आज या लेखात आम्‍ही तुम्‍हाला ग्‍लोइंग स्‍कीनसाठी साय कशा प्रकारे वापरावी याबद्दल सांगणार आहोत. तसेच ते योग्यरित्या लावण्याची पद्धत काय हे देखील जाणून घेणार आहोत. तर तेलकट त्वचेवर साय कशा प्रकारे लावू शकता आणि साय लावण्याचे काही तोटे आहेत का हे देखील जाणून घेऊ या.
 
आपण स्वयंपाकघरात काम करताना किंवा जेव्हाही दूध गरम करता त्यावर मलई येते. दुधाच्या वरती जाड थर बसतो त्याला साय म्हणतात. साय अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असते. ही खावेसे वाटते आणि त्वचेसाठी फायदेशीर असल्याने ते त्वचेवरही लावले जाते. साय त्वचेला बाहेरून हायड्रेट आणि मॉइश्चरायझ करते आणि तुमची त्वचा चमकदार बनवते.
 
त्वचेसाठी साय या प्रकारे वापरावी-
साय मृत त्वचेच्या पेशी साफ करते. साय नैसर्गिक क्लिन्झर म्हणूनही काम करते. क्लोग पोअर्स साफ करण्यासोबतच त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास याने मदत होते. साय फक्त चेहऱ्यावर लावता येते असे नाही तर साय गुडघ्यांवर किंवा कोपरांवरही लावता येते. हे करण्यासाठी तुमच्या त्वचेला चमचाभर साय आणि लिंबाच्या रसाने काही मिनिटे मसाज करावी लागेल नंतर ते कापसाने स्वच्छ करुन पाण्याने धुतल्याने लवकरच निकाल मिळतो.
 
मॉइश्चरायझ कर्‍यात मदत करते - 
साय जाड थर फॅट्सने समृद्ध असल्याने त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करते. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमची त्वचा कोरडी होत आहे, तेव्हा हातावर साय घ्या आणि मसाज करा. ते केवळ तुमची त्वचा मऊ आणि लवचिक बनवत नाही तर तुमच्या डेड स्कीनला देखील बरी करते.
 
नैसर्गिक चमक- 
साय तुम्हाला मऊ त्वचेची सुंदर अनुभूती देते. साय तुमच्या त्वचेचे पोषण करुन नैसर्गिक चमक देईल. त्वचेवर ग्लो येण्यासाठी त्यात थोडी हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा स्वच्छ करा.
 
टॅन काढण्यास मदत होते -
सनबर्न झालेल्या त्वचेला आराम देण्यासाठीही सायीचा वापर केला जाऊ शकतो. याने जळलेली त्वचा थंड होते आणि पोषण देखील मिळतं. अँटिऑक्सिडंट-समृद्ध साय देखील त्वचेच्या टॅनपासून मुक्त होण्यास मदत करते.
 
जळजळ नाहीशी होते-
साय एक अद्भुत घटक आहे ज्याने नैसर्गिकरित्या तुमची त्वचा थंड होते. याने कोरड्या आणि निर्जीव त्वचेच्या समस्यांना सामोरा जाण्यात मदत होते. भेगा पडलेल्या टाचांसाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. कोणत्याही कारणाने त्वचेची जळजळ होत असल्या त्यावर साय एक चांगला उपाय आहे. तुम्हाला फक्त सायीमध्ये एक चमचा मध घालायचा आहे आणि हा पॅक तुमच्या त्वचेवर लावायचा आहे. 20 मिनिटे तसेच राहू द्या. 20 मिनिटांनंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा.
 
साय लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या-
तुम्ही फ्रीजमधून काढून साय थेट चेहऱ्याला लावता असाल तर ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे.
चेहर्‍यावर साय लावण्यापूर्वी एकदा चांगल्या क्लिंझरने चेहरा स्वच्छ करा.
आता खोलीच्या तपमानावर असलेली साय चेहऱ्यावर लावा. साय लावण्यासाठी तुम्ही ब्रश देखील वापरू शकता.
ते चेहऱ्यावर लावा आणि फक्त 15 मिनिटे राहू द्या. यापेक्षा जास्त काळ साय चेहऱ्यावर ठेवू नये हे लक्षात ठेवा.
विहित वेळेनंतर चेहरा पुसून स्वच्छ करा. नंतर कोणताही फेसवॉश न लावता, कोमट पाण्याने चेहरा धुवा.
टॉवेलने चेहरा कोरडा करा, घासू नका.
 
तेलकट त्वचेवर साय या प्रकारे लावावी-
तेलकट त्वचेसाठी ज्यांना पिगमेंटेशनची समस्या आहे, सायीमध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनंतर धुवा. हे चेहऱ्यावरील डाग अतिशय प्रभावीपणे हलके करू शकते.
 
सायीत हळद टाकून चेहऱ्यावरही लावू शकता. अशाप्रकारे त्वचा चमकदार होईल आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास देखील मदत होईल.
 
अनेक वेळा तेलकट त्वचेच्या महिलांना चेहऱ्यावर किंवा इतर भागांवर कोरडे ठिपके पडण्याची समस्या असते. अशा स्थितीत जर तुम्ही साय लावली तर ते अगदी नाण्यांच्या आकारात क्रीम घेऊन त्वचेवर लावावे.
 
टीप: एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची त्वचा कशीही असली तरी रात्री कधीही साय लावून झोपू नका. याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती