हसत राहा, तारुण्य टिकवा

शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (10:56 IST)
तरुण दिसणे कोणाला आवडणार नाही. पण यासाठी केवळ मेकअपचं एकमेव पर्याय नाही. आपण आनंदी असाल तर आपोआप चेहर्‍यावर दिसून येईल. कारण आनंद आरोग्य आणि सौंदर्यांसाठी महत्त्वाचं ठरतं. मोकल्यापणाने हसल्याने स्नायूंवर येणारा ताण सौंदर्यांत वाढ करतं.
 
आपल्या आवडीच्या माणसांसोबत राहा
मिळून मिसळून राहणे लोक आनंदी राहतात. अशात आपल्या मित्रांसोबत किंवा अशा लोकांसोबत राहा जी आपल्या प्रसन्न ठेवतात. अशा लोकांसोबत चांगला वेळ घालवा. हसल्याने मन रमतं आणि ताण दूर होतो. 
 
लोकं आकर्षित होतात
हसमुख राहणार्‍यांकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हसल्यामुळे ताण कमी होतो, उत्साह निर्मित होतो. कामाची गुणवत्ता वाढते. 
 
हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फीलगुड घटक क्रियाशील होते ज्याने नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. हे पेनकिलर प्रमाणे कार्य करतं. हसल्यामुळे रक्तसंचार सुरळीत 
 
राहतं. चेहरा टवटवीत राहतो. आनंदी राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि संसर्गासोबत लढण्याची क्षमता वाढते. 
 
कॉमेडी शो पाहा
आपल्याला सहसा हसू येत नसेल तर कॉमेडी शो बघा. याने ताण विसरुन आपण आनंदी व्हाल आणि मूड फ्रेश होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती