कांद्याचे तेल बनवून रोज करा केसांची मॉलिश, येतील नवीन केस

शुक्रवार, 14 जून 2024 (07:39 IST)
Onion Oil Benefits: तुमचे केस जर खूप गळत असतील तर रोज केसांना लावावे कांद्याचे तेल. ज्यामुळे तुम्हाला केस गळती पासून अराम मिळेल. तसेच नवीन केस येण्यास मदत होईल. जाणून घ्या कसे बनवावे कांद्याचे तेल 
 
वाढते प्रदूषण आणि खराब पाण्यामुळे केस गळतात. जर वारंवार केस गळत असतील तर परिणामी टाकलेपणा यायला लागतो. याकरिता केस गळतीकडे दुर्लक्ष करू नये. केसांचे तुटणे बंद करून नवीन केस येणासाठी कांद्याचे तेल खूप गुणकारी मानले जाते. 
 
कसे बनवावे कांद्याचे तेल-
घरीच कांद्याचे तेल बनवण्यासाठी 200 ग्रॅम नारळाचे तेल घ्यावे. या तेलामध्ये एक बारीक कापलेला कांदा आणि 1 कप कडी पत्ता टाकून उकळवून घ्या. तसेच कांदा बारीक करून देखील यामध्ये टाकू शकतात. पण तेल उकल्यानंतरच कांदा घालावा. 5 ते 10 मिनिट थंड होण्यासाठी ठेवावे. आता तेलाला गाळून घ्या. तसेच बॉटलमध्ये भरून घ्या. या तेलाला रोज लावावे किंवा शॅंपू कराल तेव्हा लावावे. 
 
कांद्याचे तेल लावण्याचे फायदे-
कांद्यामध्ये एंजाइम्स असतात. जे केस वाढवणे आणि नवीन केस येण्यासाठी मदत करतात. कांद्याचे तेल लावल्यासकेस मोठे आणि घनदाट होतात. केसांचे गळणे कमी होते. या तेलामुळे पांढरे केस देखील काळे होण्यास मदत होते. टाळूवर असलेले कोणत्याही प्रकारचे बॅक्टीरिअल इंफेक्शन देखील कांद्याच्या तेलाने दार होते. कांद्याचे तेल नियमित लावल्यास केस मऊ बनतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती