गुलाबी ओठ चेहऱ्याची सुंदरता वाढवण्यास मदत करतात. पण अनेक महिलांची समस्या असते की त्यांचे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी बनत नाही. उन्हाळ्यामध्ये ओठांमधील ओलावा कमी होतो आणि ओठ काळे पडतात. तसेच केमिकल युक्त क्रीम, लिपस्टिक वापरल्याने ओठांचे सौंदर्य नष्ट होते. अश्यावेळेस तुम्ही घरगुती उपाय केल्यास ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी करू शकाल.
साखर , ऑलिव ऑइल आणि लिंबाचे मिश्रण-
एका बाऊलमध्ये एक चमचा साखर घ्या त्यामध्ये ऑलिव ऑइल आणि लिंबाचे काही थेंब घालावे. मग ओठांचा मसाज करावा. यानंतर पाण्याने धुवून घ्यावे. यामुळे ओठांचे काळेपणा दूर होईल व ओठ गुलाबी होतील.
एलोवेरा जेल
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी एलोवेरा जेल लावावे. एलोवेरामध्ये आईंक औषधी गन असतात.जे त्वचेच्या समस्येला दूर ठेवतात.
गुलाब जल
गुलाब जल हाइपर पिंगमेंटेशन ला कमी कारण्यास मदत करते. कॉटनच्या मदतीने ओठानावर गुलाबजल लावल्यास अनेक फायदे मिळतात.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल
गुलाबी ओठांकरिता व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा उपयोग करावा. व्हिटॅमिन ई कॅप्सूल ओठानावर लावून ठेवावी. यानंतर टिशू पेपर ने पुसून लीप बाम लावावा.
नारळाचे तेल-
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी नारळाचे तेल लावावे. याचा नियमित उपयोग केल्याने ओठांचा रंग उजळतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.