हिवाळ्यात या स्किन केयर टिप्स चेहरा उजाळतो, आवर्जून अवलंबवा

शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (15:13 IST)
हिवाळ्यात, लोक अनेकदा त्यांच्या त्वचेची काळजी व्यवस्थित घेत नाही. उदाहरणार्थ, बरेच लोक सनस्क्रीन न लावता बराच वेळ उन्हात बसतात, असं केल्याने त्वचा टॅन होतेच पण दररोज तासनतास उन्हात बसल्याने शरीराचे निर्जलीकरण देखील होते. या मुळे त्वचा खराब होते अशा परिस्थितीत आपण आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये त्वचा चांगली ठेवणासाठी काही टिप्स समाविष्ट करा.
 
1 त्वचा हायड्रेट ठेवा - हिवाळ्यातही आपली त्वचा हायड्रेट आणि ग्लोइंग स्किन ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या, जास्त पाणी प्यायल्याने त्वचेतील कमतरता दूर होऊ शकते. या मुळे विषारी पदार्थ बाहेर पडतात, म्हणून दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
 
2 सनबाथ घेतांना लक्षात ठेवा - सूर्याच्या थेट किरणांपासून दूर राहा. थंड वातावरणातही सूर्याच्या यूव्ही किरणे सक्रिय राहतात. जास्त वेळ उन्हात बसल्याने त्वचा टॅन होऊन त्याची चमक कमी होते. हिवाळ्यातही उन्हात बसण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला. जर आपण सूर्याच्या हानिकारक किरणांपासून स्वतःचे संरक्षण केले नाही तर त्वचेचे कोणतेही उत्पादन वापरणे आपल्यासाठी निरुपयोगी ठरेल.
 
3 त्वचेला मॉइश्चरायझ्ड ठेवा- दिवसातून दोनदा चेहरा धुवा, चेहरा मॉइश्चरायझ आणि हायड्रेट  ठेवण्यासाठी चांगल्या हर्बलचा वापर करा. यासाठी पुन्हा-पुन्हा फेसवॉश लावण्या पेक्षा साध्या  पाण्याने चेहरा धुवू शकता.
 
4 CTM आवश्यक आहे- क्लीनिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग म्हणजेच CTM दिवसातून एकदा तरी  आवश्यक आहे. त्वचा स्वच्छ करण्यासाठी दूध वापरले जाऊ शकते. आपल्या त्वचेच्या टोननुसार टोनिंग ची निवड करा आणि त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल वापरा.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती