सुंदर दिसण्यासाठी स्त्रिया खूप प्रयत्न करतात. चांगले कपडे परिधान करतात. चांगला मेकअप करतात. या मध्ये लिपस्टिक त्यांचा लूक छान बनवण्यात खूप मदत करते. या साठी महिला लिपस्टिकचे अनेक रंग निवडतात आणि वेळोवेळी त्यांच्या आवडीनुसार आणि ड्रेसच्या मॅचिंगनुसार लावतात. पण लिपस्टिकची संख्या जास्त असल्याने अनेक वेळा काही लिपस्टिक दीर्घकाळ टिकून राहतात, तर काही लिपस्टिक एक्स्पायर होतात. अशा परिस्थितीत जर आपण एक्स्पायर झालेले लिपस्टिक वापरले तर अनेक नुकसान होऊ शकत. एक्स्पायर झालेली लिपस्टिक कशी ओळखायची जाणून घेउ या.
1 लिपस्टिक मधून दुर्गंध येते - आपण लिपस्टिक उघडताच किंवा लावताच, एक सुंदर चवीचा सुगंध येतो, जर आपल्याला लिपस्टिक मधून दुर्गंध येत असेल तर अशा लिपस्टिकचा वापर करणे टाळा कारण ही लिपस्टिक वापरण्यासाठी योग्य नाही.
3 लिपस्टिक कोरडी होते- जेव्हा आपण कोणतीही लिपस्टिक आणतो तेव्हा ती खूप चांगली आणि ओलसर असते ज्यामुळे ती आपल्या ओठांवर सहज लावता येते. पण जर आपल्या लक्षात आले की आपली लिपस्टिक कोरडी होऊ लागली आहे, तिचा पोत बदललेला आढळला तर ती चुकूनही वापरू नका.