ब्युटी टिप्स : नेलपॉलिशची एक्सपायरी डेट तपासण्यासाठी या टिप्स फॉलो करा

बुधवार, 2 मार्च 2022 (22:44 IST)
नेल पॉलिश हे हाताचे सौंदर्य वाढवते. बहुतेक महिलांना नखांवर ड्रेसशी जुळणारे नेल पॉलिश कलर लावणे आवडते. पण हे करत असताना त्या एकतर नेलपॉलिशची एक्सपायरी डेट तपासायला विसरतात किंवा बाटली तले नेल पॉलिश कोरडे होईपर्यंत वापरतात.

आपली आवडती नेलपॉलिश देखील एक्स्पायरी होते हे  माहीत आहे का? किती दिवसांपर्यंत ती नेलपॉलिश वापरू नये ते जाणून घ्या.
सामान्यतः नियमित नेलपॉलिश 18-24 महिन्यांनंतर आणि जेल नेलपॉलिश 24-36 महिन्यांनंतर संपते
 
नेलपॉलिशची एक्सपायरी डेट तपासण्यासाठी या टिप्स फॉलो करा
 
* एक्सपायरी झालेली नेलपॉलिश शोधण्यासाठी आधी त्याचे लेबल तपासा. नेलपॉलिश वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, हे त्याच्या लेबलवरून कळते.  
* जर नेलपॉलिशचा रंग कालांतराने बदलला असेल तर ते फेकून द्या. अशा प्रकारच्या नेलपॉलिशच्या वापरामुळे  नखांना इजा होऊ शकते. 
* कधी कधी नेलपॉलिशची बाटली हलवल्यानंतरही नेलपॉलिश नीट मिसळत नाही कधी खूप घट्ट  आणि पातळ असते, त्यामुळे नखांवर लावताना ते सारखे कोट होत नाही. जर आपल्या सोबतही असे होत असेल तर ते खराब नेलपॉलिशचे लक्षण असू शकते. 
* नेलपॉलिशची बाटली सहज उघडत नसेल तर समजा की ती एक्स्पायरी झाली आहे. वास्तविक, नेलपॉलिश जमून बसल्यामुळे ते सहजासहजी उघडत नाही.
* ठराविक वेळेनंतर नेलपॉलिशचा रंग फिका पडू लागला किंवा त्यातून वेगळा वास येऊ लागला, तर समजून घ्या की नेलपॉलिश एक्स्पायर झाली आहे. 
 
 नेल पॉलिश कसे साठवायचे -
* नेलपॉलिश लवकर कोरडे होऊ नये या साठी ते फ्रीजमध्ये ठेवू शकता.
* नेलपॉलिशची बाटली नेहमी सरळ ठेवावी जेणेकरून ती लवकर खराब होणार नाही. 
* नेहमी ब्रँडेड नेलपॉलिश वापरा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती