हेअर स्पा घेण्यासाठी या 5 स्टेप्स जाणून घ्या ,कोंडा आणि केसगळती साठी नैसर्गिक DIY हेअर मास्क
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (10:34 IST)
हेअर स्पा करण्यापूर्वी मूलभूत गोष्टी जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. अनेक वेळा असे देखील होते की आपण खूप चांगले हेअर प्रोडक्ट वापरता पण संपूर्ण प्रक्रिया माहित नसल्यामुळे हेअर स्पा मुळे केस खराब होतात. अशा परिस्थितीत, हेअर स्पाची संपूर्ण प्रक्रिया आणि स्टेप्स माहित असणे आवश्यक आहे.
हेअर स्पाच्या पाच स्टेप्स -
1 हेयर ऑइल -केसांना तेल लावण्यासाठी आपण खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा अगदी मोहरीचे तेल देखील घेऊ शकता. डबल बॉयलर प्रक्रियेने तेल हलके गरम करा आणि नंतर केसांच्या मुळांना लावा.
2 मसाज-ऑइल लावल्यानंतर स्कॅल्प मध्ये चांगले मसाज करा. आपल्याला 10-15 मिनिटे केसांना मसाज करावे लागेल. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तेल स्कॅल्प पर्यंत पोहोचते.
3 शैम्पू-नैसर्गिक शैम्पू वापरा, ज्यामध्ये पॅराबेन्स किंवा क्षार यांसारखी रसायने नसावी. यासाठी आपल्याला शॅम्पू थोड्या पाण्यात मिसळून लावायचा आहे.
4 कंडिशनर-कधीही स्कॅल्पला कंडिशनर लावू नका , नेहमी कंडिशनर केसांच्या लांबीवर लावा. स्कॅल्पला कंडिशनर लावल्याने केस गळण्याची समस्या सुरू होते.
5 हेअर मास्क-आपण नैसर्गिक घटकांचा वापर करून हेअर मास्क बनवू शकता. आठवड्यातून एकदा हेयर मास्क लावावा. असं केल्याने केस चमकदार आणि मऊ होतात.
डोक्यातील कोंडा, केस गळण्यासाठी नैसर्गिक हेअर मास्क -
हेअर मास्क बनवण्यासाठी केळी चांगले मॅश करा. आता त्यात ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि केस आणि मुळांवर 15 मिनिटे मास्क सारखे लावा. एक टॉवेल कोमट पाण्यात भिजवा, तो पिळून घ्या आणि केसांना 20 मिनिटे गुंडाळून ठेवा. नंतर शॅम्पू करा.
केसातील कोंड्यासाठी -
जर कोंडयाचा त्रास होत असेल तर एलोवेरा जेल आणि लिंबाचा बनवलेला हा पॅक लावणे फायदेशीर आहे. यासाठी एलोवेरा जेलमध्ये लिंबाचा रस मिसळा आणि केस आणि त्यांच्या मुळांना चांगल्या प्रकारे लावा. जेल सुकल्यानंतर, कोमट पाण्यात भिजवलेला टॉवेल पिळून घ्या आणि केसांना 20 मिनिटे गुंडाळून ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
केसांच्या गळतीसाठी-
जर केस जास्त गळत असतील तर या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी एक कप कच्च्या दुधात दोन चमचे मध मिसळून केसांना लावा. कोमट पाण्यात भिजवलेला टॉवेल पिळून 15-20 मिनिटे केसांना गुंडाळा. नंतर शैम्पूने केस धुवा.