'अशीही वेळ येईल की जगभरात होणाऱ्या जगव्यापी आगीमुळे बऱ्याच राष्ट्रांमध्ये नरसंहार होईल.... ही वेळ कधी येईल याचा संकेत देऊन ते सांगतात की ते वृषभ, कर्क, सिंह, कन्या, मंगळ, गुरु आणि सूर्याच्या अमलाखाली आल्यावर पृथ्वी पेटेल सर्व अरण्ये आणि शहरे नष्ट होतील. जश्या प्रमाणे मेणबत्तीवर लिहिलेले शब्द'. अशी ग्रहांची स्थिती 1994 साली बनली होती. आता 22 फेब्रुवारी 2020 मध्ये त्यानंतर पुन्हा 28 मे 2021 रोजी पुन्हा होणार आहे. (सेंचुरी 6-35)
नॉस्ट्रेडॅमसच्या भविष्यवाण्यांचे स्पष्टीकरण देणाऱ्या लोकांच्या म्हणण्यानुसार, 2020 साठी केलेली भविष्यवाणी जगात वाढणारा नैसर्गिक धोका आणि भयंकर हिंसाचाराची चिन्हे दर्शविते. नॉस्ट्रेडॅमसच्या खास 5 भविष्यवाणी जाणून घेऊ या.
1 हवामानाच्या बदलमुळे होणारे विनाश : पृथ्वीचे वातावरण वेगाने बदलत चालले आहे. ब्राझीलच्या अमेझनच्या जंगलामध्ये लागलेली आग आणि ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली आग या शतकातील भयानक शोकांतिका आहेत.
दुसरी कडे जगातील ग्लेशियर संपत चालले आहे. अलीकडील हवामानाच्या बदलमुळे आईसलँडचे ऑक्झकुल ग्लेशियर संपत चालले आहे. त्याचप्रमाणे अंटार्क्टिका, अलास्का, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, किलीमांजारो पर्वत, चिली, ग्रीनलँड आणि हिमालयासह जगभरातील हिमनदींचा बर्फ वेगाने वितळत चालला आहे.
तिसऱ्या बाजूला, पृथ्वीच्या नैसर्गिक स्रोतांच्या निरंतर शोषणामुळे भविष्यात एकतर समुद्राचे साम्राज्य पृथ्वीवर राहील किंवा फक्त आग होईल. नॉस्ट्रेडॅमसच्या मते या वर्षी हवामान बदलावाचा परिणाम संपूर्ण जगावर होईल आणि प्रदूषणाविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम कार्ये राबविण्यात येतील. या वर्षी जगाच्या काही भागात जोरदार वादळ आणि भूकंप येतील.
नॉस्ट्रेडॅमसच्या भविष्यवाणीनुसार धनू राशीचा बाण एखाद्या गडद हालचालीकडे निर्देशित करत आहे. विनाशाचे संकेत मिळत आहे. त्यापूर्वी तीन ग्रहण होतील. त्यानंतर सूर्य आणि पृथ्वीवर तीव्र भूकंप होतील. सूर्यावरील भूकंपांमुळे किरणांच्या तीव्र वादळांमुळे पृथ्वी तापेल जेणेकरून ध्रुवावरील बर्फ वितळण्यास सुरुवात होईल. असे झाल्यास पृथ्वीचे ध्रुव देखील बदलतील. कुंभ राशीच्या प्रभावाच्या सुरुवातीसच आकाशातून एक मोठी आपत्ती येईल. पृथ्वीच्या बऱ्याच भागांना या आपत्तीजनक पुरांचा फटका बसू शकतो. त्यामुळे जीवित व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.
2 वर्ग संघर्ष वाढेल : नॉस्ट्रेडॅमसच्या भविष्यवाणीनुसार हे वर्ष हिंसाचाराने भरलेले असणार. बऱ्याच देशांमध्ये सरकारविरुद्ध निर्दशनासोबत वर्ग संघर्षही वाढेल. नॉस्ट्रेडॅमसच्या म्हणण्यानुसार मध्यपूर्वी आणि जगातील इतर काही भागात धार्मिक कट्टरतेमुळे गृहयुद्धसदृश्य परिस्थिती निर्माण होईल आणि बऱ्याच लोकांना आपल्या देशाला सोडून इतर देशांमध्ये आश्रय घ्यावे लागणार. सध्या ही परिस्थिती तर कायम आहेच. या भविष्यवाणीनुसार सन 2020 मध्ये जगातील मोठ्या देशांमध्ये गृहयुद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल आणि लोकं रस्त्यावर उतरतील.
नॉस्ट्रेडॅमसने 2020 चे वर्ष अत्यंत हिंसक वर्ष म्हणून सांगितले आहे. 2020 या वर्षांसाठी नॉस्ट्रेडॅमसने हा अंदाज वर्तला आहे. तसे भारतात नवीन वर्षाच्या आधी पासूनच सीएए ला घेऊन मतभेद आहेच सीएए चा विरोध होतच आहे. या व्यतिरिक्त फ्रांससह मध्य पूर्वातील बऱ्याच देशांमध्ये हिंसक निषेध होतच आहे.
3 तिसऱ्या महायुद्धाची भीती : नॉस्ट्रेडॅमसच्या भविष्यवाणीनुसार तिसऱ्या महायुद्धाचा उद्रेक कधीही होऊ शकतो. 2020 मध्ये आशियातील सर्वात मोठा लष्करी अभ्यास सुरू करण्याच्या अमेरिकेच्या योजनेशी हा अंदाज वर्तला जात आहे. 2020 मध्ये बऱ्याच देशांमध्ये संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जर का तिसरे महायुद्ध झाले की नॉस्ट्रेडॅमसच्या विश्लेषकांच्या मते, त्या काळादरम्यान अग्नीचा एक गोळा पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत आहे. ज्यामुळे पृथ्वीवरील मानव नष्ट होऊ शकतात. हे तिसरे महायुद्ध चालू असताना घडेल. एक उल्का महासागरात जाऊन पडेल आणि सर्व पाणी पृथ्वीवर पसरेल त्यामुळे पृथ्वीवरील बहुतेक राष्ट्रे बुडतील किंवा असे ही होऊ शकते की ही भीषण टक्कर पृथ्वीला कारणीभूत ठरेल. अशी पण शक्यता वर्तविली जात आहे की पृथ्वी आपल्या जागेवरून सरकून अंधारात विलुप्त होईल.
4 जगातील अर्थव्यवस्था कोलमडेल : नॉस्ट्रेडॅमसच्या मते 2020 देखील या शतकातील सर्वात मोठे आर्थिक संकटे येतील. तथापि, हा अंदाज सोडलाच तर अमेरिका आणि चीन मधील संघर्षामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत वाईट आहे. अर्थव्यवस्थेचे केंद्र हॉंकॉंग या क्षणी हिंसाचारच्या आगीत होरपळत आहे. ह्याचा परिणाम भारतासह दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे.
5 मोठ्या नेत्यांच्या जीवनास धोका : नॉस्ट्रेडॅमसच्या 2020 सालच्या भविष्यवाण्यांचा अर्थ लावणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही धक्कादायक भविष्यवाण्या वर्तविल्या आहे की या वर्षी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचा हत्येचा कट रचला जाऊ शकतो.
अमेरिकेचे अध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे भारताचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचे षडयंत्र दोन वेळा उघडकीस आले आहे. दुभाष्याच्या मते, ग्रेट ब्रिटनची राणी 2020 मध्ये मरण पावू शकते, त्यानंतर प्रिन्स चार्ल्स ग्रेट ब्रिटनच्या सिंहासनावर बसून पदभार स्वीकारतील आणि लवकरच स्कॉटलंड आणि वेल्सला भेट देऊ शकतात.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की नॉस्ट्रेडॅमसच्या काही भविष्यवाण्यांचा इंटरनेटवर दरवर्षी याच प्रकारे प्रचार केला जातो. त्यांचा भविष्यवाण्यांचे अनेक अर्थ काढले जाऊ शकतात. आणि त्यांचा अंदाज अनेक लोकांशी जोडला जाऊ शकतो.
म्हणून आतापर्यंत हवामानाच्या बदलण्याचा प्रश्न आहे ते बऱ्याच वर्षांपासून सुरूच आहे. दरवर्षी नैसर्गिक घटना घडतात. 2 किंवा 3 सूर्य ग्रहण देखील येतातच. दरवर्षी एखाद्या कारणास्तव एखाद्या नेत्याला ठार मारले जाते. वर्ग संघर्ष तर प्रत्येक देशात बऱ्याच काळापासून सुरूच आहे. पुढील वर्षी तिसऱ्या महायुद्ध होण्याची दाट शक्यता वर्तविली जाते आणि असे असल्याचे वर्षाच्या अखेरीस जाहीर केले जाते. अश्या परिस्थितीत या भविष्यवाण्यांवर विश्वासार्ह्य राहण्याचे कोणतेही आधार नाही.